एलपीजी कनेक्शनचे नियमितीकरण आणि
नावात बदल करण्याची प्रक्रिया
एलपीजी कनेक्शनचे नियमितीकरण:
उदाहरण १
एक किंवा अधिक सिलेंडर, प्रेशर रेग्युलेटर ताब्यात असलेल्या व्यक्तीला अधिकृत ग्राहकाच्या संमतीने कनेक्शन नियमित करायचे असल्यास.
- प्रत्यक्षात उपकरणे असलेल्या व्यक्तीच्या नावावर कनेक्शन हस्तांतरित करण्यासाठी नोंदणीकृत ग्राहकाकडून घोषणा/संमती.
- अशा कनेक्शनच्या हस्तांतरणाच्या कोणत्याही दाव्यांविरुद्ध तेल कंपनीला नुकसान भरपाई देणारी एसव्ही आणि उपकरणे यांच्या वास्तविक धारकाकडून घोषणापत्र. - वितरकाकडे प्रारूप उपलब्ध आहे.
- वितरक रेकॉर्डमध्ये तपशीलांची पडताळणी करेल. नोंद सापडल्यावर, वितरक मूळ एसव्ही धारकाच्या नावाने टीव्ही तयार करेल आणि तेल कंपनीला नुकसान भरपाई करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा ठेव परत करेल.
- उपकरणे धारकाकडून प्रचलित दराने सुरक्षा ठेव जमा केली जाईल आणि त्याच्या/तिच्या नावाने नवीन एसव्ही जारी करण्यात येईल.
- एसव्ही हरवल्यास/गहाळ झाल्यास, एसव्ही हरवल्याचे हमीपत्र सादर करावे लागेल.
उदाहरण २
कोणत्याही कनेक्शन दस्तऐवजांशिवाय एक किंवा अधिक सिलेंडर आणि प्रेशर रेग्युलेटर ताब्यात असणारी व्यक्ती:
- कोणत्याही कनेक्शनचे दस्तऐवज (एसव्ही/डीजीसीसी) नसतांना एलपीजी उपकरणे धारण करणार्या व्यक्तींनी हमीपत्र सादर करावे आणि उपलब्ध उपकरणांची संपूर्ण सुरक्षा ठेव प्रचलित दराने भरावी.
उदाहरण ३
कनेक्शन धारकाच्या मृत्यूमुळे कनेक्शनचे हस्तांतरण:
- जवळच्या नातेवाईकाने मूळ एसव्ही जमा करावी आणि (i) मृत्यू प्रमाणपत्र तसेच (ii) कायदेशीर वारस प्रमाणपत्र यांच्या प्रती /इतर कायदेशीर वारसांकडुन एनओसी/अभिवचन योग्य स्वरूपात सादर करावे. मूळ एसव्ही प्रमाणेच ठेवीवर कायदेशीर वारसाच्या नावाने नवीन एसव्ही जारी केरण्यात येईल.
- मूळ एसव्ही प्रमाणेच ठेवीवर कायदेशीर वारसाच्या नावाने नवीन एसव्ही जारी केरण्यात येईल.
ग्राहकाच्या हयातीत नावात बदल:
- नावातील बदल केवळ सामान्य योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कनेक्शनसाठी लागू असून पीएमयूवाय अंतर्गत योजनेस लागू नाही. (यूआयडी)
- एलपीजी कनेक्शनच्या हस्तांतरणास परवानगी आहे,
अ) कुटुंबाअंतर्गत परवानगी आहे (उदा. वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, जोडीदार, मुले). अशा हस्तांतरणाच्या बाबतीत सुरक्षा ठेव रकमेत कोणताही बदल होणार नाही.
ब) प्रचलित दराने सुरक्षा ठेव रकमेत बदल करून कुटुंबाबाहेर हस्तांतरण शक्य आहे. कनेक्शन ज्यास हस्तांतरित होईल त्याने बदलेली सुरक्षा ठेव रक्कम भरावयाची आहे.
- नोंदणीकृत ग्राहकाने कुटुंबातील सदस्याच्या नावे लेखी संमती सादर करावी. ज्याच्या नावावर कनेक्शन हस्तांतरित करावयाचे आहे अशा सदस्याने हस्तांतरणाच्या कारणास्तव तेल कंपनीला कोणत्याही दाव्यांविरूद्ध नुकसानभरपाई देण्यासाठी - वितरकाकडे प्रारूप उपलब्ध आहे.
- मूळ कनेक्शन टर्मिनेशन व्हाउचर (टीव्ही) द्वारे समाप्त केले जाईल. ताजे सबस्क्रिप्शन व्हाउचर (एसव्ही) ज्याच्या नावावर कनेक्शन हस्तांतरित करावयाचे आहे अशा/नियमित ग्राहकाच्या नावाने जारी केले जाईल.
टीप: नियमितीकरण / नाव बदलण्याच्या वरील सर्व प्रकरणांमध्ये, ज्याच्या नावावर कनेक्शन हस्तांतरित करावयाचे आहे अश्या सदस्याच्या नावावर पीएसयू ऑइल कंपनीचे इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे तसेच ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासह, केवायसी फॉर्म व योग्यरित्या भरलेले घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. जमा केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे पुनरावृत्ती होत नसल्याची खात्री केल्यानंतरच कनेक्शन नियमित केले जाईल आणि यशस्वी अधिकृत तपासणीनंतर, नवीन एसव्ही ग्राहकाला देण्यात येईल.