एलपीजी वापरकर्ता म्हणून, माझ्या स्वयंपाकघराच्या सुरक्षिततेसाठी मी जबाबदार आहे! मी प्रतिज्ञा करतो/करते की….
- मी गॅस सिलिंडर वापरात नसताना रेग्युलेटर बंद करण्याची जबाबदारी घेईन.
- मी नेहमी माझा गॅस स्टोव्ह उंच प्लॅटफॉर्मवर आणि सिलिंडरच्या ऊंची पेक्षा वर ठेवेन.
- मी सिलिंडर घेताना वजन आणि गळती तपासण्याची खात्री करेन.
- मी प्रत्येक 5 वर्षांनी माझ्या एलपीजी इन्स्टॉलेशनची अधिकृत मेकॅनिककडून तपासणी करून घेईन.
- आणि, जर मला एलपीजीचा वास येत असेल तर, मी त्वरीत उपाय करेन. रेग्युलेटर बंद करून, इलेक्ट्रिकल किंवा बॅटरीवर चालणाऱ्या उपकरणांना स्पर्श न करता, त्वरित 1906 वर कॉल करेन.
माझे स्वयंपाकघर, माझी सुरक्षा, माझी जबाबदारी!