पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी, १० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२:३० वाजता दूरचित्रवाणी सम्मेलनद्वारे महोबा, उत्तर प्रदेश येथे एलपीजी कनेक्शन सुपूर्द करून उज्ज्वला योजनेच्या (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - पीएमयुवाय) दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उज्ज्वला लाभार्थ्यांशी संवाद साधतील आणि देशाला संबोधितही करतील.
उज्ज्वला १.० ते उज्ज्वला २.० पर्यंतचा प्रवास
उज्ज्वला १.० दरम्यान, २०१६ मध्ये लॉन्च करण्यात आले, बीपीएल कुटुंबातील ५ कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर, योजनेचा विस्तार एप्रिल २०१८ मध्ये आणखी सात श्रेणीतील महिला लाभार्थ्यांना (अनुसूचित जाती/जमाती, प्रधान मंत्री आवास योजना(पीएमएवाय) , अंत्योदय अन्न योजना (एएवाय) करण्यासाठी करण्यात आला. तसेच ८ कोटी एलपीजी कनेक्शनचे उद्दिष्ट सुधारण्यात आले. हे लक्ष्य तारखेच्या सात महिने आधी ऑगस्ट २०१९ मध्ये गाठले गेले.
वित्त वर्ष २१-२२ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पीएमयुवाय योजनेअंतर्गत एक कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शनची तरतूद जाहीर करण्यात आली होती. या एक कोटी अतिरिक्त पीएमयुवाय कनेक्शन्स (उज्ज्वला २.० अंतर्गत) कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना डिपॉझिट-मुक्त एलपीजी कनेक्शन प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे जे पीएमयुवायच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट होऊ शकत नाहीत.
प्रथम रिफिल आणि हॉटप्लेट उज्ज्वला २.० लाभार्थ्यांना डिपॉझिट-फ्री एलपीजी कनेक्शनसह विनामूल्य प्रदान केले जाईल. तसेच नावनोंदणी प्रक्रियेसाठी किमान कागदपत्रे आवश्यक असतील. उज्ज्वला २.० मध्ये, स्थलांतरितांना शिधापत्रिका किंवा रहिवासी पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही. 'कौटुंबिक घोषणा' आणि 'पत्त्याचा पुरावा' या दोन्हीसाठी स्वयं-घोषणा पुरेशी असेल. उज्ज्वला २.० एलपीजी वर सार्वत्रिक प्रवेशाचे पंतप्रधानांचे स्वप्न साध्य करण्यात मदत करेल.
यावेळी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.