इंट्रा कंपनी पोर्टेबिलिटी

वितरकांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करून ग्राहकांना सुधारित सेवा मिळावी म्हणून, ग्राहकांना समान पत्त्यावर सेवा देणाऱ्या वितरकांपैकी सरस वितरक निवडण्यासाठी पोर्टेबिलिटीचा पर्याय देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, मूळ वितरकाच्या सेवांबाबत समाधानी नसलेला ग्राहक, अधिक चांगल्या सेवांसाठी समान क्षेत्रात सेवा देत असलेल्या वितरकांच्या यादीतून निवडलेल्या वितरकाकडे स्थलांतर करू शकतो. या प्रणालीमध्ये ग्राहक गमावणारे वितरक विद्यमान ग्राहकांना तत्पर सेवा देऊन सदैव आकर्षित करण्यास उत्सुक असतात. यामुळे ग्राहकांचे अधिक चांगले समाधान होवून वितरकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी चालना मिळेल.

पोर्टल आणि अॅपमध्ये नोंदणीकृत लॉगिनद्वारे पोर्टेबिलिटी सुरू केल्यामुळे, ग्राहकाने वितरकाकडे पोर्टेबिलिटीसाठी प्रत्यक्ष जाणे, मूळ वितरकाने हस्तांतरणाची विनंती नाकारणे किंवा स्वीकारणे आणि नंतर पुढील वितरकाकडे त्याची नोंदणी करणे, आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता करणे, वैगरे अडथळे पूर्णपणे दूर होवून सर्व प्रक्रिया डिजिटल माध्यमांमुळे सहज सोपी झाली आहे.

इंट्रा कंपनी पोर्टेबिलिटी पर्याय ऑनलाइन उपलब्ध झाल्याने, वितरक बदलू इच्छिणारा ग्राहक पोर्टल किंवा अॅपमध्ये अर्ज सबमिट करू शकतो आणि तो मूळ वितरकाने स्वीकारला नसला तरीही स्वयंचलित हस्तांतरण प्रक्रियेत रूपांतरित होतो. त्यानंतर ग्राहक त्यांच्या आवडीच्या वितरकाकडून सर्व सेवा घेऊ शकतात.

पोर्टेबिलिटीच्या नोंदणीसाठी, ग्राहकांनी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

  1. ओएमसी वेबसाइटला भेट द्या:
  2. याआधीच नोंदणी केली नसल्यास वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करा.
  3. आपापल्या क्षेत्राची सेवा देणारे वितरक आणि रीफिल डिलिव्हरीच्या कामात त्यांचे स्टार रेटिंग पहा (५ स्टार- उत्कृष्ट, ४ स्टार- चांगले, ३ स्टार- सरासरी, २ स्टार- सरासरीपेक्षा कमी आणि १ स्टार- खराब).
  4. सूचीमधून तूमच्या आवडीचे वितरक निवडा.
  5. यानंतर ग्राहकाला पोर्टेबिलिटी विनंतीची पुष्टी करणारा आणि सध्यस्थिती दाखवणारा ईमेल येईल.
  6. इंट्रा-कंपनी पोर्टेबिलिटी विनंतीच्या संदर्भात, ग्राहकाने मूळ वितरक किंवा निवडलेल्या वितरक यांपैकी कोणालाही भेट देण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण सर्व रेकॉर्ड डिजिटल माध्यमांद्वारे हस्तांतरित केले जातात.
  7. पोर्टेबिलिटी योजनेअंतर्गत कनेक्शन हस्तांतरित करण्यासाठी कोणतेही हस्तांतरण शुल्क किंवा अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारण्यात येणार नाही.
  8. एस्केलेशन मॅट्रिक्सद्वारे पोर्टेबिलिटी विनंतीचे प्रोएक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग आणि त्याचे समापन हे सुनिश्चित करते की ग्राहकाला त्याच्या आवडीचा वितरक मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

या उपक्रमामुळे या क्षेत्रात सेवा देणाऱ्या वितरकांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण होवून वितरकांच्या ग्राहक सेवेत उत्कृष्टता येईल आणि ज्या ग्राहकांना ऑइल कंपन्यांपैकी त्यांचा एलपीजी वितरक बदलायचा असेल किंवा त्याच्या निवासस्थानाजवळच्या वितरकाकडुन सेवा घ्यायची असेल, त्यांना निवड करण्याचा पर्याय मिळेल.

इंट्रा कंपनी रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी