उज्ज्वला २.० अंतर्गत कनेक्शन मिळविण्यासाठी पात्रतेचे निकष
- अर्जदाराचे (केवळ महिला) वय किमान १८ वर्षे असावे.
- त्याच घरातील कोणासही ओएमसी कडून कोणतेही एलपीजी कनेक्शन मिळालेले नसावे.
- खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गातील प्रौढ महिला – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), अति मागासवर्गीय (एमबीसी), अंत्योदय अन्न योजना (एएवाय), चहा आणि माजी चहा बाग जमाती, वनवासी, बेटे आणि नदी बेटांचे रहिवासी, एसइसीसी कुटुंबांतर्गत (एएचएल टिन) किंवा १४-कलमी घोषणेनुसार कोणत्याही गरीब कुटुंबांतर्गत नोंदणी केलेले.
आवश्यक दस्तऐवज
- तुमच्या ग्राहकाला ओळखा (इकेवायसी)
- ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आधार कार्ड जर अर्जदार आधारमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असेल तर (आसाम आणि मेघालय वगळता).
- ज्या राज्यातून अर्ज करण्यात येत आहे त्या राज्याने जारी केलेले रेशन कार्ड/ राज्य सरकारने जारी केलेले कौटुंबिक रचना प्रमाणित करणारे इतर दस्तऐवज / परिशिष्ट I नुसार स्वयं-घोषणापत्र (स्थलांतरित अर्जदारांसाठी)
- दस्तऐवजातील क्र.सं. ३ मध्ये नमुद केलेल्या लाभार्थी आणि प्रौढ कुटुंबातील सदस्यांचे आधार.
- बँक खाते क्रमांक आणि आएफएससी क्रमांक
- कुटुंबाची स्थिती दर्शवीणारा पूरक केवायसी.
अर्जदार व्यक्ती वितरकाकडे अर्ज करून किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे विनंती करून तिच्या पसंतीच्या कोणत्याही वितरकाला अर्ज करू शकते. ऑनलाइन पोर्टलद्वारे.